सोलापूर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यातील ग्रामपंचायतच्या थकीत कर वसूलीसाठी व थकबाकीदार नागरिकांसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे . या मोहिमेंतर्गत ३१ डिसेंबर पर्यंत कर भरणाऱ्या करदात्यांना थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे . त्यामुळे शनिवार २७ डिसेंबर व रविवार २८ डिसेंबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत करवसूलीसाठी कामकाज सुरू होता. या दिवशी कर्मचाऱ्यांनी कर वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले. सुट्टी असतानाही थकबाकी कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यालयात उपस्थित होते . कर्मचारी उपस्थित असल्यामुळे नागरिकांकडूनही थकबाकी भरण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अनेक ग्रामपंचायतीचे थकित कर एक कोटीपेक्षा अधिक आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणार्या, नोकरदार व निवडणुक लढविणार्या नागरीकांकडूनच घरपट्टी , पाणीपट्टी व ग्रामपंचायतीची इतर कर भरणा करण्यात येते. उर्वरित नागरीक करभरणा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे थकीत कर रक्कम वसुलीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात विशेष मोहीम सुरू केल्याने नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचार्यांनी तन , मन व धनाने काम करून व जनजागृती करून अधिकाधिक थकीत रक्कम वसुली केल्याचे सांगण्यात येते. कर्मचार्यांनी परीश्रम घेऊन वसूल केलेली रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
…
..,,
कर्मचार्यांचे विशेष योगदान
…
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत शासनाने ग्रामपंचायतीच्या थकित करवसुलीसाठी विशेष मोहीम राबविले. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचार्यांनी प्रामाणिक काम करून व जनजागृती करून अधिकाधिक रक्कम वसूल केली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मोहीम सुरू राहणार असून थकीत रक्कम वसूल करण्यात ग्रामपंचायत कर्मचार्यांचे विशेष योगदान आहे.
मनोज राऊत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर
….
करवसुलीस प्राधान्य
…
शनिवार व रविवार सुट्टी असतानाही ग्रामपंचायत थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी कार्यालयात हजर होते. सुट्टी असतानाही नागरीकांनी थकीत रक्कम भरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
शब्बीर लिगेवान, कर्मचारी, ग्रामपंचायत मंद्रूप, दक्षिण सोलापूर,


























