सांगोला – रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार सांगोला येथील ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, साहित्यिक दत्ताजी कुलकर्णी, कोकण विभाग सहा.ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, महेंद्र दळवी, प्रकाश कालेकर, ग्रंथमिञ कुंडलिक मोरे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड, प्रमुख कार्यवाह साहेबराव शिंदे, ग्रंथमिञ विजयकुमार पवार यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला. गुलाबराव पाटील यांच्या ग्रंथालय चळवळीतील प्रदीर्घ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी संजय सरगर, अमर कुलकर्णी, बिरुदेव काळे, मच्छिंद्र लेंडवे, अनिल कुलकर्णी, औदुंबर काळे, शिवाजी नागणे, सिध्दार्थ खरात, प्रथमेश बनसोडे, सारिका माडीकर, वृशाली हजारे, छाया मोरे, अमृता कुलकर्णी, वृशाली काळे, रमेश कोकरे, अनंत ढोले उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

























