सिडको येथे डॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवीन नांदेड प्रतिनिधी
डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सकाळी १० वाजता सिडको कार्यालयाचे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातील एक साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सकाळी ठीक १० वाजता सिडको प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहन करून. डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुख परिसरातील माजी नगरसेविका बेबीताई गोपीले, जनार्दन गुपीले, राघोबा वाघमारे, नारायण कोलंबीकर , माधव डोम्पले,शंकर धिरडीकर , नितीन वाघमारे,केशव कांबळे,माधव आंबटवार आनंदा गायकवाड, पप्पू गायकवाड, विठ्ठल घाटे,राजू लांडगे, डि.के.कांबळे, संदिप गायकवाड, प्रदिप हानवते,मरीबा बसवंते, विलास गजभारे, विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे,श्यामराव कांबळे, राजू जमदाडे, भि.ना. गायकवाड, किशन रावणगावकर, करूणा जमदाडे, बालाजी पाटोळे,एस. कुंभारे, आनंदा वाघमारे, नरसिंग दरबार ,सुदर्शन कांचनगिरे ,आर.जे.वाघमारे, ज्ञानेश्वर ढाकणीकर, प्रमोद मेड, संजय निळेकर,नागेश वाघमारे,विशाल गडंबे,नवनाथ कांबळे,गजानन कहाळेकर यांच्यासह सिडको परिसरातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.