*जनविकास शिक्षण संस्थेत आन्नाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन*
भोकरदन : भोकरदन शहरातील जनविकास शिक्षण संस्थेत साहित्यरत्न लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा मा नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते दोन्ही ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, मुख्याध्यापक मनोज लेकुरवाळे, नागेश घुगे,पालक युसूफ पठाण ( मिस्ञी), रामचंद्र गायके, पंजाबराव देशमुख व मान्यवर यांची उपस्थिती होती,