सोलापूर – श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हत्तुर संचलित श्री सोमेश्वर हायस्कूल हत्तुर येथे माजी चेअरमन कै.आप्पासाहेब भरले यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निंगराज शिवयोगी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिलीसिद्ध पुजारी होते.यावेळी जयराज भरले यांच्याकडून क्रीडा विभागाला ११ हजार रुपयांचे गणवेश देण्यात आले.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक गुरु अचलेरे यांनी केले तर सुधाकर बिराजदार यांनी आभार मानले.



















