सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक सतीश सिरसीला, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका मंजिरी किल्लेदार, नगरसेविका सारिका खजुरगी, नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका दीपिका यलदंडी, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका कविता गज्जम, वासू येलदंडी, कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे आदी उपस्थित होते.


























