सोलापूर – बार असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विधी व्याख्यानमालेचा ज्ञानसमृद्ध प्रवास सातत्याने सुरू असून, त्याच मालिकेतील दहावे व्याख्यान दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी सोलापूर बार असोसिएशन हॉल, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आणि प्रभावी उपस्थितीत संपन्न झाले. मोटार अपघात दावा अर्जांच्या प्रक्रियात्मक बाबी, अर्ज दाखल करण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंतचे टप्पे, पुराव्यांचे महत्त्व, न्यायालयीन कामकाजातील व्यवहार्य अडचणी तसेच प्रभावी युक्तिवादासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनाचा विशेषतः युवा वकील बांधवांना मोठा लाभ झाला.
या व्याख्यानासाठी मा. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एल. एन. मारडकर, सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनुभवी कायदेतज्ज्ञ, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
त्यांनी “Procedural Aspect of Motor Accident Claim Petition ” या अत्यंत महत्त्वाच्या व व्यवहारोपयोगी विषयावर सखोल, अभ्यासपूर्ण व अनुभवाधारित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव हे होते.
प्रमुख वक्त्यांचा अल्पपरिचय बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. अरविंद देडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहसचिवा ॲड. मीरा प्रसाद यांनी मानले.
या विधी व्याख्यान कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अनेक ज्येष्ठ व मान्यवर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ वकील ॲड. पी. ए. कुलकर्णी, ॲड. मल्लिनाथ पाटील, ॲड. अशोक जालादी, ॲड. संतोष पाटील, ॲड. परमानंद जवळकोटे, ॲड. लक्ष्मण म्हेत्रे, ॲड. संतोष म्हमाणे, ॲड. महेश जाधव, ॲड. अविनाश कडलासकर, ॲड. गणेश माशाळे, ॲड. संजय पवार, ॲड. आशुतोष होरगीनमठ, ॲड. अविनाश खरटमल, ॲड. अनिरुद्ध सोनावणे, ॲड. सागर हंबीरराव, ॲड. सोनाली कोंडा तसेच इतर अनेक वकील बांधव उपस्थित होते.
सोलापूर बार असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या विधी व्याख्यानमालेमुळे वकिलांना अद्ययावत कायदेशीर ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव व व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करण्याची संधी मिळत असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.























