हदगाव / नांदेड – नगरपरिषद निवडणूक २०२५ आज दि.२१ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन शिवसेना शिंदे गटाच्या सौ. रोहिणी भास्कर वानखेडे या १२९३ च्या मतांची आघाडी घेत विजयी झाल्यात तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. कुमुद सुनील सोनुले यांना ४३१७ मत तर सौ. रोहिणी भास्कर वानखेडे यांना ५६१० मतदान मिळाले तर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सौ. सीमा बालाजी घाळप्पा यांना ३७३९ मतदान मिळाले असून सौ. रोहिणी भास्कर वानखेडे यांनी १२९३ एवढ्या मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला.
हदगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी भाजपा सह युती करत ही निवडणूक लढवली त्यात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळत निवडणूक मैदान गाजवले पण शिवसेनेला १६ जागांपैकी फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले तर भाजपाने चार जागा लढवत त्यातून तीन जागांवरती विजय संपादन केला त्यामुळे भाजपाने हदगाव नगरपालिकेमध्ये चांगले यश संपादन केले असेच म्हणावे लागेल. शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवत सात जागांवरती दणदणीत विजय संपादित केला तर सतत दहा वर्ष हदगाव नगरपालिकेत सत्तेत असणारी काँग्रेस पक्षाला यावेळेस फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले.
एकंदरीत या निकालावरून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे हदगाव शहरांवर आज सुद्धा वरचष्मा कायम असल्याचे दिसून येते. तर हादगाव शहरातील नागरिक हे नेहमीच विद्यमान आमदार यांच्या बाजूने राहून आपला शहराचा विकास कसा साध्य करायचा यात या निकालावरून ही बाब लक्षात येते.


























