येवता:प्रतिनिधी :आप्पाराव सारूक दि.o६ रोजी गट साधन केंद्र,केज कार्यालयातील सुखदेव तुकाराम तोंडे वयानुरूपी सेवानिृवत्ती झाले त्यांच्या मनोगतात ते म्हणाले न की दोन गोष्टी विचारल्या जातात….एक म्हणजे तब्येत आणि दुसरं म्हणजे तुमची मुलं काय करतात. मी ह्या दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत माझा मुलगा दंतरोगतज्ञ डॉ.भगवान सारखा कुटुंब वात्सल्य, संवेदनशील, कर्तुत्वान, स्वाभिमानी, सत्यवादी,सामाजिक भान आणि बांधिलकी ठासून भरलेला मुलगा घडवला तसेच आपली मुलं कशी सांभाळावी हेच नाहीतर कशी घडवली पाहिजे हे शिकवलं ….पेशा शिक्षक होता अनेक विद्यार्थी घडवले पण कुटुंब एका रेषेत बांधून ठेवले….. दोन मुलीचं शिक्षण करून अतिशय चांगल्या घरात एक पोलीस तर दुसरे डॉक्टर यांच्याशी विवाह करूण त्यांचे संसार आनंदात आहेत सुखदेव तुकाराम तोंडे सर केंद्रप्रमुख हे आज दि.३०/जून/२०२४ रोजी त्यांच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
तब्बल 39 वर्ष त्यांनी शासकीय सेवा दिली. 1985 साली त्यांच्या मूळ गावी सोनीमोहा ता. (किल्ले)धारूर येथे ते शिक्षक म्हणुन रुजू झाले,याठिकाणी त्यांनी बरीच वर्ष सेवा केली त्यांचे सर्व कुटूंब त्यानंतर किल्ले धारुर व काठेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणुन पद संभाळे ,
पदोन्नती झाल्यानंतर त्यांची सिरसाळा ता.परळी येथे केंद्रप्रमुख म्हणुन नियुक्ती झाली, आणि सध्या ते आडस ता. केज येथे केंद्रप्रमुख म्हणुन काम करत त्यांनी अतिरिक्त केंद्राचा पध्दभार लव्हूरी व टाकळी असे तिन तिन केंद्राची ज्वाबदारी प्रमाणीक पणे पार पाडली.
कुठलाही गैरमार्ग न वापरता त्यांनी विद्यार्थी घडविण्याचे काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी हे त्यांच्या जीवनात यशस्वी झाले.
शेतीची आवड, नातेसंबंध जोपासणे हे त्यांचे छंद आहेत. अत्यंत शांत स्वभाव, मितभाषी व धाडसी असलेल व्यक्तिमत्त्व म्हणजे सुखदेवराव तोंडे
त्यांच्या चांगल्या कार्यामुळे त्यांना जिल्हा परिषद बीड ने 1998 साली आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
त्यांच्या पत्नीने ही त्यांना खुप मोलाची साथ दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी.आ.केशवराव आंधळे,गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीलराव केंद्रे,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय चाटे,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गणेश गिरी, माजी उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड,आडस केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आनंद शेळके,केंद्रप्रमुख सुखदेवराव तोंडे,यांच्या पत्नी सौ.किसनाबाई तोंडे,डोनगावचे मा.सरपंच बाबुराव घुले,सुभाष चौरे,शिक्षिका शिक्षक वृंद इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानी सुखदेवराव तोंडे यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सर्वानी करूण त्यांचे पुढील आयुष्य जनसेवा करण्याचे भाग्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त केली.