हाणेगाव प्रतिनीधी /फारूख पटेल: देगलुर तालुक्यात सर्वात शेवटचा व कर्णाटक राज्यालगत असलेल्या कुडली गावाला जाणाऱ्या रस्तावर काहीदिवसापुर्वी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली चांगला रस्ता खोदुन त्या रस्त्यावर निकृष्ठ दर्जाचा मुरुम माती अंथरुण रस्त्यावर चिखल केला आहे.या रस्त्यावरुनच गावकऱ्यांना दैनंदीन कामानिमीत्त बाहेरगावी बाजारपेठला जाण्यासाठी तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो आहे.तर शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेला बाहेरगावी जाण्यासाठी जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे.
पावसाळा असल्यामुळे दुचाकी गाड्या चिखलात अडकून बसल्या आहेत जर एकाद्या वेळेस तात्काळ वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास अडचन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विशेष करुन राष्ट्रीय महामार्गा लगत गावचा रस्ता असुन सुद्धा याची जबाबदारी राजकीय पुढारी व प्रशासन घेण्यास तयार नाहीत याकडे संबंधीत बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालुन रस्त्याचं काम पुर्ण करुन द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रीनीवास बालाजी जाधव व तानाजी बाबुराव वीरगोंधळे यांनी देगलुर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.


![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)




















