सोलापूर शहरात जड वाहतुकीने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. सिमेंट बलकरच्या खाली येऊन दुचाकीस्वराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बलकरच्या खाली येऊन एका 42 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून 2024 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटर सायकल क्रमांक mh13 cf 33 56 यास सिमेंट बलकर क्रमांक mh 12 vf 8199 याने जोराची धडक दिली.
सुनील शिवाजी पवार वय वर्ष 42 गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह श्रवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे. या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक हे अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांचे मनात निर्माण झाला आहे.