वेळापूर – परिसरातील अनेक शाळा मध्ये वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने वीज पाणी व स्वच्छतागृहे दुरुस्तीचे काम तात्काळ करून दिल्याबद्दल वेळापूर शाळांच्या वतीने माळशिरस तालुक्याचे विस्तार अधिकारी असलम इनामदार व केंद्रप्रमुख बापूराव नाईक नवरे यांच्या हस्ते सरपंच रजनीश बनसोडे उपसरपंच नानासाहेब मुंगुस्कर ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा स्तरावर फिल्डवर काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी माजी सरपंच विश्वासराव वाघे माझी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती भुसारे रायचंद खाडे राजू पोरे , काळेसर, व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते























