Monday, August 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऑडिटच्या नावाखाली पतसंस्थांची ‘आर्थिक लूट’; सोलापूर जिल्हा फेडरेशनची प्रधान सचिवांकडे तक्रार

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यातील सहकारी पतसंस्थांकडून लेखापरीक्षणाच्या (ऑडिट) नावाखाली कोट्यवधी रुपयांची अनधिकृत वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनने केला आहे. या प्रकारामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, फेडरेशनने राज्याच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. नव्या शासन निर्णयानुसार ऑडिट फी आकारणी गरजेचे असताना देखील जुन्या परिपत्रकानुसार फी आकारली जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

     दरम्यान, याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे आणि उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला. त्यांनी सांगितले की, राज्यभरात हजारो सहकारी पतसंस्था कार्यरत असून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, लेखापरीक्षण शुल्क आकारताना कोणताही ठोस लेखी नियम, स्पष्ट दरपत्रक किंवा पारदर्शक निकष पाळले जात नसल्याने पतसंस्थांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडत आहे.

पतंगे यांनी आरोप केला की, अनेक लेखापरीक्षक हे औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत जादा शुल्क आकारतात. मात्र, त्या निर्णयातील नेमके निकष, शुल्काचे प्रमाण किंवा अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत संस्थांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. 

     परिणामी, विशेषतः छोट्या व मध्यम स्वरूपाच्या पतसंस्थांना लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासकीय दबाव आणि भविष्यातील अडचणींच्या भीतीमुळे अनेक संस्था उघडपणे विरोध करू शकत नाहीत. त्यामुळे या ‘मुक्या माराचा’ सामना करावा लागत असल्याची खंत संचालक मंडळाने व्यक्त केली.

यावेळी पतंगे यांनी १० मार्च २०१३ रोजी नेमण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण समितीचा उल्लेख केला.

      सहकार आयुक्तांनी लेखापरीक्षण शुल्काचा पुनर्विचार करण्यासाठी कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक डी. ए. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक निरीक्षणे नोंदवली होती. नागरी सहकारी बँकांच्या तुलनेत पतसंस्थांकडून तब्बल दोन ते अडीच पट जादा ऑडिट फी आकारली जात असल्याची कबुली अहवालात देण्यात आली होती. मात्र, इतकी वर्षे उलटूनही शासनाने या अहवालावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी खंत फेडरेशनने व्यक्त केली.

फेडरेशनने शासनाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. हायकोर्टातील ‘स्टे’ उठवण्यासाठी शासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सुधारित आणि स्पष्ट परिपत्रक काढून त्यानुसारच लेखापरीक्षण शुल्क आकारण्याचे आदेश सर्व लेखापरीक्षकांना द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून जादा शुल्क वसूल करणाऱ्या लेखापरीक्षकांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी आणि आतापर्यंत वसूल केलेली जादा रक्कम संबंधित पतसंस्थांना परत मिळवून द्यावी, अशीही मागणी आहे.

         या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याने विशेष तपास पथक (एस.आय. टी) नेमून संपूर्ण व्यवहारांची चौकशी करावी, अशी ठाम भूमिका फेडरेशनने घेतली आहे. या चौकशीद्वारे दोषींवर कठोर कारवाई होऊन सहकार क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.पतसंस्था या ग्रामीण व शहरी अर्थचक्राचा महत्त्वाचा भाग मानल्या जातात. त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक बोजा टाकल्यास थेट परिणाम सामान्य सभासदांवर आणि कर्जदारांवर होतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ शुल्कवाढीच्या मुद्द्याप्रमाणे न पाहता सहकार क्षेत्राच्या आरोग्याशी निगडित गंभीर विषय म्हणून पाहण्याची गरज आहे. आता राज्य शासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती पावले उचलते, प्रधान सचिव काय निर्णय घेतात आणि संबंधित यंत्रणांवर काय कारवाई होते, याकडे राज्यातील हजारो पतसंस्थांचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी ही चौकशी निर्णायक ठरणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

कोट

ज्यादा ऑडिट टी देऊन संस्थेचे लेखापरीक्षण करू नये 

शासनाच्या नव्या परिपत्रकाप्रमाणे ऑडिट आकारली जाणे आवश्यक आहे. तसे होत नसल्यास इतर संस्थांनी फेडरेशनकडे संपर्क साधावे. फेडरेशन कडून पॅनल मधील ऑडिटर संस्थेला देण्यात येईल. परंतु ज्यादा ऑडिट फी देऊन कोणीही आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण करू नये. 

– दिलीप पतंगे, अध्यक्ष सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन 

चौकट

 जुने परिपत्रकाप्रमाणे ( दि.१५/०५/१९९२)

१. एकूण उलाढालाच्या पहिल्या ५ लाखास शेकडा २५ पैसे प्रमाणे रु. १,२५०/-

२. नंतरच्या ५ लाखास शेकडा १५ पैसे प्रमाणे रु. ७५०/-

३. नंतरच्या १० लाखावरती शेकडा १० पैसे प्रमाणे रु. ९,०००/-

४. राहिलेल्या रकमेवर ५ पैसे प्रमाणे रु. ७५,५८३/-

चौकट 

नवीन परिपत्रकाप्रमाणे ( दि.२९/१०/२०१४)

१. खेळते भांडवल १० कोटींपर्यंत प्रत्येकी १०० रुपयांस ५ पैसे प्रमाणे रु. ५०,०००/-

२. खेळते भांडवल पुढील ९० कोटींसाठी प्रत्येकी १०० रु. २ पैसे प्रमाणे रु. ९,५२४/-

३. १०० कोटीच्या पुढील राहिलेल्या खेळत्या भांडवलावर १ पैसे प्रमाणे

एकूण फरक रु. २७,०५९/-

Post Views: 57
Previous Post

वेळापूर सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा सन्मान !

Next Post

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील सुपमेका मध्ये इंटर्नशिपसाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील सुपमेका मध्ये इंटर्नशिपसाठी निवड

ताज्या बातम्या

बारामतीत तिसऱ्यांदा घडला विमान अपघात #viral #news #solapurnews

August 10, 2026

रशियन रेल्वे थेट भारतात पोहोचणार #viral #news

August 10, 2026

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे अमिष दोघांवर गुन्हा दाखल #viral #news #solapurnews

August 10, 2026

थरारक पत्नीनेच रचला हत्येचा कट #viral #news #newsupdate

August 10, 2026

चाकणकरांच्या मरणाची इच्छा व्यक्त करणारा मिसाळ आत्महत्या करणार #viral #newsupdate #news

August 10, 2026

मुख्यमंत्र्यांनी घेतली सतेज पाटलांची सांत्वन पर भेट #viral #newsupdate

August 10, 2026

संसदेत मोदीजींनी घेतले राहुल गांधींची फिरकी….. #viral #newsupdate

August 10, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1046870

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!