तभा फ्लॅश न्यूज/माहूर : सिंदखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी ७८ टक्के वॉरंट निर्गमित मध्ये उत्कृष्ट कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे हस्ते नुकतेच त्यांना सन्मानित करून प्रशस्तीपत्र देऊन गौरवीन्यात आले आहे.
माहूर शहर पोलिस ठाणे नंतर तालुक्यातील दुसरे महत्त्वाचे पोलिस ठाणे असलेल्या सिंदखेड येथे चालु वर्षातील जून महिन्यात ७८% टक्के वॉरंट निर्गमित करून सपोनि रमेश जाधवर यांनी वाखाणण्याजोगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अविरत दिलेल्या पोलिस प्रशासकीय सेवेचा सन्मान करण्यासाठी नांदेड पोलिस दलाच्या वतीने सपोनि रमेश जाधवर यांचा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते यथोचित सन्मान सत्कार करत प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. यावेळी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी पोलिस कर्मचारी यांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट पोलिस सेवेबद्दल कामाची पोचपावती म्हणून त्यांना मिळालेल्या या विशेष सन्मानाबद्दल जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यासह, सिंदखेड व माहूर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचावतीने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.