सोलापूर – येथील उदयोन्मुख युवा गायक व सध्या पुणे येथील विश्वकर्मा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चि.सार्थक बावीकर याने आशिया खंडातील सर्वात मोठया असलेल्या युवक महोत्सवात शास्त्रीय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
हा महोत्सव दिनांक १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत आय आय टी पवई, मुंबई येथे मुड इंडिगो, २०२५ या नावाने पार पडला. संपूर्ण भारतातून आलेल्या स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी १४ स्पर्धक निवडण्यात आले होते, त्याची अंतिम फेरी दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी पार पडली व त्यात चि सार्थक बावीकर याचा शास्त्रीय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक आला.
याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. चि.सार्थक हा व्ही आय टी कॉलेज, पुणे यांच्या आरोह क्लबचा कलाकार आहे






















