Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खाजगी स्कुलबसबाबत शाळा प्रशासनासह आरटीओ अधिकारीही बेजवाबदार

तरुण भारतbyतरुण भारत
December 20, 2025
in marathwada
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डुवाडी – शाळकरी लहान चिमुकल्यांच्या बाबतीत कुर्डूवाडी परिसरामध्ये चालु असलेल्या खाजगी शाळा त्यांचे प्रशासन मुलांची वाहतुक करणा-या स्कुलबसच्या बाबत किती बेजवाबदार व बेपर्वा आहेत हे एखाद्या कोंबड्याच्या खुरवड्याप्रमाणे खचाखच भरलेल्या नियमभाय्य विद्यार्थी संख्येवरून दीसुन येते. बेजवाबदार बसचालकावर कारवाई तर कोण करणार असा प्रश्न उपस्थीत होतो आहे.  विशेष म्हणजे अकलुजच्या आरटीओ कार्यालयाकडून याबाबत कोणतीही कारवाई न करता उलटपक्षी संस्थाचालकांच्या मैत्रीपुर्ण सबंधामुळे सहकार्यच होते की काय असे चित्र दिसत आहे.                        

             खासगी शाळा विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा, सुरक्षित प्रवास आणि वेळेची काटेकोरता असा दावा करून पालकांकडून दरमहा दीड ते अडीच हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, बसेसची सुरक्षितता, चालकांचे प्रशिक्षण आणि शाळांची देखरेख याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शालेय मुलांचे जीव धोक्यात सापडले आहेत.

           कुर्डुवाडी व परिसरात स्कूलबसची ने-आण होताना मूलभूत वाहतूक नियमांचा सर्रास उल्लंघन होते. शाळेजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी बस थांबवून मुलांना उतरवण्याचे सामान्य ज्ञानही चालकांकडे नाही. अरुंद रस्ते किंवा वळणांवर बस अचानक थांबवली जाते. मागून-सामोरून वेगवान वाहने धावत असताना रस्ता ओलांडणाऱ्या मुलांच्या अपघाताची जोखीम संभवते.

          केअरटेकर फक्त नावापुरता

राज्य परिवहन विभागाच्या नियमांनुसार, शालेय बसमध्ये केअरटेकर अनिवार्य आहे. मात्र, अनेक बसेसमध्ये ते नसतात किंवा फक्त पुढील सीटवर बसून ओरडतात. लहान मुलांचे हात धरून उतरवणे, रस्ता पाहून बाजूला उभे करणे, दार बंद आहे का किंवा मुले व्यवस्थित बसली आहेत का? या जबाबदाऱ्या पार पाडल्या जात नाहीत.

         महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार- बसच्या खिडक्या जाळ्या किंवा ग्रिलने बंद असाव्यात. मात्र, खासगी शाळांच्या बसेसमध्ये हे पालन होत नाही. काही खिडक्या उघड्या, जाळ्या तुटलेल्या किंवा सैल, तर कुठे जाळीच नाही. दुरुस्तीचा खर्च टाळण्यासाठी  वर्षानुवर्षे जुन्या बसेस धावतात.तर काही शाळामध्ये टमटम,ओमिनी कार व जिपमधूनही नियमांचे उल्लघन करून मुलांची वाहतूक केली जाते तरीही आरटीओ अगर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दीसते.

            नुकताच घडलेला धक्कादायक प्रकार- 

शहरातील अरुंद रस्त्यावर घडलेल्या घटनेने स्कूलबस सुरक्षेची ढिसाळ व्यवस्था उघड झाली. 

शुक्रवार दि.१२ रोजी माढा रोडवरील एका वसाहतीमध्ये खासगी गाड्या उभ्या असलेल्या रस्त्यावरून स्कूल बस आत घुसवताना मागील सीटवरील सात-आठ वर्षांचा मुलगा खिडकीतून कमरेपर्यंत बाहेर डोकावला. चालकाने आरशात हे दिसत असूनही गाडी पुढे चालवली. खांबाला धडक बसली असती तर गंभीर अपघात झाला असता. केअरटेकर होता की नाही, यावर प्रत्यक्षदर्शींमध्ये संभ्रम आहे. स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “मोठी दुर्घटना होईपर्यंत डोळे उघडणार नाहीत का?” असा सवाल केला.ही बस बार्शी रोडवरील एका शाळेची असल्याचे सांगण्यात येते.

           नियम जाहीर, अंमलबजावणी शून्य

परिवहन व शिक्षण विभागाने स्कूलबससाठी कठोर नियम आखले आहेत: चालकाकडे वैध व्यावसायिक ड्रायव्हर परवाना, वाहनाची फिटनेस, प्रदूषण तपासणी, विमा अद्ययावत; दरवर्षी तांत्रिक तपासणी; “SCHOOL BUS” लेबल; आपत्कालीन दार, फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्टएड किट, विद्यार्थी-पालक यादी. मात्र, अंमलबजावणी पूर्णपणे नाही. चालकांना स्कूलबस विशेष प्रशिक्षणच मिळत नाही.याकडेही आरटीओ ने लक्ष देण्याची गरज आहे.

          शाळांची जबाबदारी टाळता येत नाही-

खासगी शाळा वाहनमालकांशी करार करून “बस खासगी आहे” म्हणत जबाबदारी टाळतात. पालकांचा असाच अनुभव आहे. मात्र, शाळेच्या नावाने विद्यार्थी ने-आण होत असल्याने शाळा मोकळ्या होऊ शकत नाहीत. 

           पालकांनी घ्यावयाची काळजी

चालकाचा परवाना, वाहन फिटनेस व विमा याची लेखी माहिती शाळेकडून घ्या.बसची प्रत्यक्ष पाहणी करा: खिडक्या, दरवाजे, फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्टएड किट तपासा. खिडकीतून हात-डोके बाहेर काढू नये हे घरीच मुलांना शिकवा, बस मध्ये धावधाव न करणे.”विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत कोणत्याही शुल्कापेक्षा मोठी आहे. छोटी बेपर्वाही आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. पालकांनो जागरूक होऊन मुलांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करा.

विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत आपण सर्व शाळांना काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.स्कूलबस मध्ये केअर टेकर ठेवणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समिती असते. महिन्याला या समितीची मीटिंग घेतली जाते यामध्ये पालक मुख्याध्यापक आणि कमिटी यामध्ये स्कूलबस फी व इतर सुरक्षा मुद्द्यावर चर्चा केली जाते. वरील संदर्भात शाळेचे नाव समजले असते तर त्यांना आपण नोटीस देऊ. 

       विकास यादव( गट शिक्षण अधिकारी माढा पंचायत समिती, कुर्डुवाडी)

मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आजपासून कुर्डुवाडीमध्ये तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश काढतो आणि कारवाई करतो. 

—–अमरसिंह गवारे,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)

Post Views: 205
Previous Post

आय आय टी मुंबई, मुड इंडिगो २०२५ फेस्टिव्हल मध्ये सोलापूरच्या सार्थकचे यश

Next Post

जो दुसऱ्यांसाठी झटतो त्याचा समाजाने सन्मान केला पाहिजे – ज्ञानेश्वर भरगडे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जो दुसऱ्यांसाठी झटतो त्याचा समाजाने सन्मान केला पाहिजे - ज्ञानेश्वर भरगडे 

ताज्या बातम्या

पार्थिव गणेशाची खरी पद्धत सांगतायत पंचांगकर्ते मोहन दाते#solapur

September 13, 2026
विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199342

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!