हाणेगाव प्रतिनीधी /फारुख पटेल: हाणेगाव येथील कृ.उ.बा.समिती ही देगलुर कृ.उ.बा.समितीत विलीन झाली असुन तिथूनच संपुर्ण कारभार पाहीला जातो आहे दोन्ही बाजार समीत्या मोठ्या आहेत बाजारपेठ मोठी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची आवक जावक मोठी असुन समीत्यांचा उत्पन्न देखील भरपुर आहे
पण चालु संचालक मंडळ नुकसानीत आहे असे दाखवुन कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या नावाखाली हाणेगाव येथील दुय्यम कृ.उ.बा.समिती येथील शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडाची लिलावामार्फत विक्री करण्याचा संचालक मंडळाने घाट घातला आहे. देगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समिती हाणेगाव येथील शेतकऱ्यांसाठी निवारा,शेतमाल,शेतकऱ्याचे वाहणे थांबवावी आदी कारणासाठी १० ते १२ भुखंड मोकळे आहेत
मात्र बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याच्या नावाखाली बाजार दरानुसार पाच ते सहा कोटींचा भुखंड किरकोळ दराने लिलावामार्फत विक्री करण्याचा घाट संबंधीत बाजार समितीच्या संचालक मंडळाने घातल्याची चर्चा आहे यामुळे सहाय्यक निबंधकांनी या तक्रारीचा व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन ही भुखंड विक्रीस तात्काळ प्रतीबंध करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दिलीप बंदखडके यांनी सहाय्यक निबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.