भोकरदन : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. कोलकाता येथील एका डॉक्टर महिलेवर बलात्काराची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात बलात्कार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर शहरात झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे,
दरम्यान याच पार्श्वभूमीवर माणूसकीला काळीमा फासणारी घटना बदलापूरमध्ये घडल्याने भोकरदन येथे नागरिक रस्त्यावर उतरले आहे, बुधवार रोजी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी त्या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला, गृहमंत्र्याचे निलंबन झालेच पाहिजे, गृहमंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद , या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देत राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला,
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिंबक आप्पा पाबळे, उदबा मनीष श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख,उबाठा महेश पुरोहित, माजी नगरसेवक कबीर बापू, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्धकी, महेश आवटी,उदबा नवनाथ दौड, शिवराज्य संघटनेचे विकास जाधव, आप्पासाहेब जाधव, माजी सैनिक बबन शिंदे, मा. सैनिक गायके यांच्यासह शेकडो नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते,