बारड शिवारात रोही प्राण्याचा धुमाकूळ शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी
मुदखेड ता प्र
बारड शिवारातील वनस्पती उद्यान परिसरातील शेत शिवारात रोही प्राण्यांने धुमाकूळ माजवला असुन शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तुर,मुग,उडद,या पिकाला खाऊन फस्त करत असल्याने शेतकर्याचे अतोनात नुसकान करत असल्याचे समोर आले आहे शेतकरी पिकांचे नुकसान होत असल्याने हैराण झाला असुन वनविभागाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे शेतकर्यांनी सांगितले या रोहीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांन कडून करण्यात येत आहे
शिवारात चाळीस रोहीचा कळप असल्याने एका सोयाबीन शेतात थांबले की सोयाबीन सह ईतर पिके खाऊन फस्त करत आहेत रोही येत असल्याने शेतकर्यांना पावसाळ्यात शेतात जागल करावी लागत असल्याने जीव मुठीत धरून रात्री रोहीना हाकलतांना कसरत करण्याची वेळ आली असून वनविभाग मात्र याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जंगल परिसरातील शेतकऱ्यांना रोहीचा मोठ्या प्रमाणात त्रास असून येणारी सुगी पिके फस्त होत असल्याने हजारो रुपये खर्च करून पिकांची लागवड केली जाते परंतु प्राण्यांच्या करण्यात येणाऱ्या नुसकाने पुढे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना समोरे जावे लागणार आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी पिकांच्या नुसकाने रोहीच्या कळपा मुळे त्रस्त झाला आहे
वनविभागा मात्र याकडे दुर्लक्ष कतर असून शेतकर्याच्या मदतीला वनविभागाचे कर्मचारी येत नसल्याचे समोर आले असून फोनवरूनच शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत.
रोहीच्या कळपाचा बंदोबस्त तातडीने करावा झालेल्या पिकांचे नुसकान पंचनामे करुन वनविभागाने द्यावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
बारड शिवारात रोहीने पिकांची नुसकान मोठ्या प्रमाणात करत असल्याचे पिकांची नुसकान भरपाई द्यावी वनविभागाने याचा बंदोबस्त करावा
अवधूत शिरगिरे
ग्रा.प.सदस्य
बारड
रोहीने सोयाबीन पिक फस्त केले असल्याने मोठे नुकसान झाले आहे पिकांची नुसकान भरपाई वनविभागाने द्यावी
पिराजी रँपनवाड
शेतकरी बारड