उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अँड. उज्वल निकम यांची निवडणूक प्रचार फेरी सांताक्रूझ परिसरात पार पडली. त्याला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“मुंबईकरांचे योध्दे” ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सांताक्रूझ पश्चिम या भागात प्रचार फेरी काढली. स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह स्थानिक भाजपा नगरसेवका हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, अलका केरकर यांच्यासह आसिफ भामला, मनसेचे तुषार आफळे, शिवसेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर, रिपाइंचे विवेक पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांताक्रूझ येथील फिरोज शहा मेहता रोड, स्टेशन परिसर, टागोर रोड, सांताक्रूझ पोलीस ठाणे परिसर, स्वामी विवेकानंद मार्ग या परिसरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून अँड निकम आणि अँड आशिष शेलार यांनी मतदारांशी संपर्क केला. ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटना, गृहनिर्माण संस्था आणि मंदिर आणि प्रार्थना स्थळांचे पदाधिकारी हार, पुष्पगुच्छ देऊन पुष्पवृष्टी करुन उमेदवारांचे स्वागत करीत होते. स्थानिक मोठ्या आस्थेने अँड. उज्वल निकम यांंना पाठिंबा दर्शवत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.