पंढरपूर – येथील अकबर अनिल येथे राहणारी ६वर्षाची चिमुकली सहेर सरफराज तांबोळी हिने पहिला रोजा केला होता. तिचे कौतुक होत आहे.
मुस्लीम समाजात रमजान महिन्यात १ नेकी केल्याने ६० नेकी केल्याचे श्रेय मिळत असते. उन्हाळा असतानाही या लहान मुलीने उपवास केला आहे.
सहेर तांबोळी हिने सईद मौलाना यांच्या उपस्थितीत मक्का मशीद येथे रोजाचा उपवास सोडला आहे. याबद्दल विशेष कौतुक होत आहे.























