भोकरदन शहरात ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य ; घंटागाडी तात्काळ सुरू करा नागरिकांची नगरपरिषदच्या सीओला निवेदन
भोकरदन : भोकरदन शहरात नगर परिषद च्या हलगर्जीपणामुळे गल्ल्या बोळात कचऱ्याच्या ढिगरामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे,त्यातच शहरात घंटा गाडी १ महिन्यापासुन येत नाही त्यामुळे शहरात सर्व ठिकठीकाणी घानीचे ढेर पडले आहे व नाल्या मध्ये कचरा देखील अडकत असून याबाबत शहरातील नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, दरम्यान या निवेदनात या निवेदनात नमूद केले आहे की भोकरदन शहरात एक महिन्यापासून घंटागाडी येत नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी डापके साचत असल्यामुळे डासाचा प्रदुभाव वाढला आहे, त्यामुळे घरामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुले वयोवुध्द देखीलआजारी पडत आहे.
व आजाराचे प्रमाण वाढले आहे. डासामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरात धूर फवारणी करण्यात यावी व शहरातील घंटा गाडी तात्काळ चालु करण्यात यावी नाल्यामध्ये अडकलेला कचरा काढण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे, या निवेदनावर मा.नगरसेवक नसीम पठाण, मा. नगरसेवक अब्दुल कदिर बापू, गुड्डू कादरी
समाजसेवक शेख रिजवान पेंटर,शेख अजीम, शेख रईस,आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष महजद खान, यांच्यासह अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत,