सरपंचांनी घेतली ग्रामस्थांची राञी ची शाळा
विद्यार्थी काळात मुलांवर चांगले संस्कार घडवणे हि काळाची गरज सुभाष भोपळे
जाफराबाद प्रतिनिधी
जाफ्राबाद:- जाफराबाद तालुक्यातील देऊळझरी येथील सरपंच सुभाष पाटील भोपळे यानी गावातील नागरिक सोबत संवाद साधला यावेळी त्यानी मोबाईल चा अति वापरा मुळे मुलांच्यात दैनदिन जीवनात होणारे दुष्परिणाम व पालकांनी घेण्याची काळजी आज काल मुलांच्या हातात कोरोनाने फोन दिला असं हल्ली सर्रास म्हटलं जातं पण हे सपशेल चूक आहे. आणि मोठ्यांच्या जगानं स्वतःची जबाबदारी कोरोनावर आणि फोनवर ढकलण्याचे उद्योग आहेत.
फारतर आपण असं म्हणू शकतो की कोरोनामुळे ज्या मुलांच्या हातात फोन आलेले नव्हते त्याही मुलांच्या हातात फोन आले.
मुलांच्या हातात फार पूर्वीपासून फोन आहेत. मग ते स्वतःचे असतील नाहीतर पालकांचे, आजीआजोबांचे. आणि त्यावर मुलं काय करतात याचा पत्ता मोठ्यांच्या जगाला अनेकदा नसतो.
मुलं मोबाईलवर गेम्स खेळतात, सर्च करतात, चॅटिंग करतात तसेच ते पॉर्न बघतात.
अनेकदा मुलांपर्यंत पॉर्न घरातल्या मोठ्यांच्या फोनमधूनच पोचतं हेही वास्तव आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, मोबाईलमुळे प्रत्येक व्यक्तीला आभासी जगात भटकण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. एक प्रकारचं ‘आयसोलेशन’.
या खासगीकरणामुळे अनेकदा पालकही त्यांच्या त्यांच्या फोनवर काय बघत असतात याचा पत्ता एकमेकांना नसतो. त्यातच पालकांमध्ये माध्यम शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे त्यामुळे आपण पॉर्न फोनवर बघत असू तर नंतर त्या लिंक्स, क्लिप्स डिलीट केल्या पाहिजेत हे अनेक पालकांना समजत नाही.
मुलं मोबाईल घेतात तेव्हा थेट पॉर्न साईट्सवर जाऊन पोचतात.
दुसरं म्हणजे ऑनलाईन जगात ‘तसलं’ जग बघता येतं हे मुलांना फार लवकर समजतं. त्याविषयी घरात पालकांशी, शाळेतही कसलाही संवाद नसल्यामुळे आपण जे काही बघतोय ते मुळात बघायला हवं का, त्याचे आपल्या मनावर काय परिणाम होऊ शकतात या कशाचीही विचार कुणीही केलेला नाही.
बहुतेक पालक माझी मुलं ‘तसलं’ काही बघत नाही याच विचारात असतात. घरातल्या ‘संस्कारी’ वातावरणावर त्यांच्या अतीच विश्वास असतो. तो असायला ही हरकत नाही पण मोबाईल देताना काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे हेही ते स्वीकारत नाहीत. आणि मग सायबरच्या जगात एकटी पडलेली मुलं त्यांना जमेल, झेपेल त्या पद्धतीने ते जग बघायला, त्यात स्वतःला शोधायला सुरुवात करतात.
मुलांकडून असं का घडतं?
मुलांचं वर्तन हा विविधस्तरीय विषय आहे. त्यात घरातलं वातावरण, आईबाबांचे परस्पर संबंध, त्यात आपलेपणा आहे की नाही, घरातला पालकांचा पॉवर गेम, सत्तावादी पालकत्व, मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करुन न देता पाठी घालण्याची पालकांची वृत्ती, घरगुती हिंसा, मुलांवर राग काढण्याची पालकांची सवय, पालक आणि पाल्य विसंवाद अशी अनेक कारणं असतात, असू शकतात आणि यातच आता हातातल्या फोनने भर घातलेली आहे. यावर सर्व पालकांनी सुध्दा मोकळे पणाने संवाद साधला आणि विद्यार्थ्यांवर लक्ष देण्याच संवाद साधून सोडण्याच अश्वासन दिल.