सोलापूर : सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे असल्याचे गौरवोद्गार पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी, आधार युवा ग्रुपचे प्रमुख, तज्ञ योगशिक्षक असलेले भगवान बनसोडे यांनी काढले. अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सोलापुरातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आधार योगा ग्रुप आणि श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘राम कृष्ण हरी’ या भजनाने करण्यात आली. या भजनाला गायनाचार्य ह.भ.प. तानाजी महाराज बेलेराव यांनी स्वर साथ दिली, तर सुप्रसिद्ध मृदुंग वादक दिलीप वाघमारे यांनी मृदुंगावर साथसंगत केली.
यानंतर प्रमुख मान्यवर हेमंत पिंगळे, चंद्रकांत पवार, पतंजली योगाचे स्वाती राऊत, बसवराज उंबर्जे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आधार योगा ग्रुप आणि श्री संत मुक्ताई प्रतिष्ठानच्या वतीने ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचा मुख्य सत्कार करण्यात आला.
महाराजांचा ५४ वा वाढदिवस असल्याने ५४ दिव्यांनी ओवाळणी घालून त्यांचा वाढदिवस भक्तिभावात साजरा करण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने उपस्थित भाविकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
सत्काराला उत्तर देताना हरिभक्ती पारायण ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे म्हणाले की, जीवनात वेळेला महत्त्व दिल्यास जीवन अधिक सुखकर होते. नियमित योग व प्राणायाम केल्यास आरोग्य सुदृढ राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते, असा मौलिक संदेश त्यांनी दिला. शेवटी त्यांनी सर्व आयोजक, मान्यवर आणि उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा कार्यक्रम संजय जगताप,विजय जगताप, शंकर चौगुले, विलास चिंचोलकर, व्ही डी पाटील, सावंत साहेब, नाना कुरडे, मच्छिंद्र पाटील तसेच मुक्ताई महिला योगा ग्रुपच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश अलदर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी जाधव यांनी केले.

























