सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे,आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शशिकांत चव्हाण, रोहिणी तळवडकर,अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
हा उद्घाटन व लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिका प्रांगणात पार पडला. यामध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP), जिल्हा नागरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, चलित नागरी वस्ती सुधारणा योजना, माझी वसुंधरा अभियान ४.०, शाळांचे सुशोभीकरण तसेच स्वच्छ सोलापूर मिशन अंतर्गत विविध कामांचा समावेश होता.या योजनांतर्गत शहरातील नागरी वस्ती, रस्ते, स्वच्छता, पर्यावरण, शालेय सुविधा व सार्वजनिक सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, सोलापूर शहरास ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित’ बनवण्यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेने नवीन अत्याधुनिक स्वीपर मशीन्स उपलब्ध केल्यामुळे, शहराच्या स्वच्छतेवरील अतिरिक्त ८ लाख रुपये मासिक खर्च वाचणार आहे.सांडपाणी पुनर्वापर: कचरा संकलन व सांडपाणी पुनर्वापरासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे शहरातील ७० टक्के सांडपाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे.शौचालय सुविधा: शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या प्रश्नासाठी १०.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, लवकरच या समस्येचे पूर्ण समाधान केले जाईल.यावेळी प्रमुख विकास कामांचा माहिती व महापलिकाच्या १४० सेवा ऑनलाइन स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध आहेत याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली
एकूण उद्घाटन झालेल्या कामे अशी –
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम (४२ रस्त्यांचे काम) कामे ४२ रक्कम ३९.९२कोटी
दलितेतर नागरी वस्ती सुधारणा (कामे ४७)रक्कम ४०.६०
जिल्हा नगरोत्थान योजना (रस्ते, ड्रेनेज) ( कामे १४१,) रक्कम २५.९७ कोटी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ना.व.सु. योजना ( कामे १०४) , रक्कम २१.३९ कोटी
महानगरपालिका नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजना (३५ कामे) ६. ७२ कोटी,
जिल्हास्तर दलितेतर योजना १३ घंटागाडीचे लोकपर्ण
माझी वसुंधरा अभियांन ४. ० अंतर्गत हरीत पट्टा (काम ३) १ कोटी
मनपा स्वनिधीतून शौचालय नूतनिकरण (१४० काम)१०. ५८ कोटी
मनपा स्वनिधीतून स्वीपर मशीन (१)७. ८० कोटी..

























