Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकास अपहरण करुन २ कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी ९ जणांची निर्दोष मुक्तता

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मौजे दहिटणे, ता. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चवतराव लावंड यास अपहरण करुन त्याचेकडील रिव्हॉल्वर व रोख रक्कम काढून घेवून त्यास सोलापूर येथील वाडधामध्ये डांबुन ठेवून मारहाण करुन २ कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातुन १) बसलिंगप्पा शिवशरण खेडगी, २) अशोक भद्रप्पा मुलगे, ३) चंद्रकांत नामदेव मिसाळ, ४) शोएब इसाक पटेल, ५) अमोल गोविंद नाईकोडे, ६) मारुती नारायण माने, ७) सचिन कृष्णा शिंदे, ८) कुणाल काशिनाथ जगताप व ९) अजय सुभाष सारंगमठ यांची मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी  निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, श्री स्वामी समर्थ सरकारी कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चवतराव लावंड यास दि.०८/०२/२०१३ रोजी सायंकाळी ०४.३० वा. सुमारास तत्कालीन चेअरमन सिद्रामप्पा पाटील यांनी कारखानास्थळी त्यांचे केबिनमध्ये बोलावून घेवून ऊस पुरवठा करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या कामास न आल्याने कारखाना ऊस पुरवठा अभावी बंद करावा लागत असल्याने कारखान्याचे २ कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याने ते २ कोटी रुपये दे असे त्यास म्हणून तत्कालीन संचालक बसलिंगप्पा खेडगी व सशस्त्र अंगरक्षक अमोल नाईकोडे यांना प्रल्हाद लावंड यांची अंगझडती घ्यायला लावून त्याचेकडील रोख ७,०००/- एटीएम कार्ड, गाडीची चावी व रिव्हॉल्वर काढून घेवून त्यास बेशुध्द होईपर्यंत बेदम मारहाण करण्यास लावून तेथुन त्यास कारमध्ये जबरदस्तीने घालुन सोलापूर येथील इन चॅनलचे कार्यालय असलेल्या वाङधामध्ये आणून डांबुन ठेवले व तेथेदेखील मारहाण करुन त्याचे रखवालीस सचिन शिंदे व कुणाल जगताप यास ठेवून त्याचेकडे व त्याच्या पत्नीकडे रोख रक्कम रुपये २ कोटीची खंडणी मागितली. त्यानंतर दि.११/०२/२०१३ रोजी प्रल्हाद लावंड याने त्यास सोलापूर येथील वाड्यात डांबुन ठेवले असून त्याचा घातपात होण्याची शक्यता आहे व त्याला वाचवावा असा मेसेज मोबाईलद्वारे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक संजीवकुमार पाटील यांना पाठवून मदत मागितल्याने त्या संदेशाच्या आधारे पोलीस उपअधिक्षक अशोक जाधव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सदर बंद वाडचात बाजुच्या इमारतीवरुन प्रवेश करुन प्रल्हाद लावंड यांची तेथुन सुटका केली व सचिन शिंदे व कुणाल जगताप यांना अटक केली. अशा आशयाची फिर्याद सुरुवातीस प्रल्हाद लावंड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर सदर गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

खटल्याचे सुनावणी दरम्यान मा.आमदार सिद्रामप्पा पाटील, काशिनाथ भरमशेट्टी व हुसेन भैरामडगी यांचे निधन झाले. खटल्याचे सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याचे अंतिम युक्तीवादावेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आरोप ठेवण्यात आलेल्या घटना पाहणारा स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही, फिर्यादीचे रिव्हॉल्वर, एटीएम कार्ड, गाडीची चावी त्याचे राहते घरातून जप्त करण्यात आली आहे, सचिन शिंदे व कुणाल जगताप यांना घटनास्थळावरुन अटक केल्याचा पुरावा नाही, २ कोटी रुपयाची मागणी खंडणी नसुन कारखान्याची येणेरक्कम असल्याचे पुराव्यावरुन दिसुन येत असल्याचे सांगुन अनोळखी आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली नाही, फिर्यादीने पोलीस उपअधिक्षक यांना पाठविलेल्या मेसेजबाबत कोणताही पुरावा मिळुन आला नाही असे मुद्दे मांडून त्या पृष्ठर्थ मे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरुन मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. आर.जे. कटारिया यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

*यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. राजकुमार मात्रे यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले.*

चौकट
निकाल ऐकायला अप्पा हवे होते… ॲड. मिलिंद थोबडे

प्रस्तुत खटल्यामध्ये दि.११/०२/२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला व दि.१५/११/२०१४ रोजी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी ११ वर्षे २१ दिवस चालली व दरम्यान माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची प्रकृती खालावल्याने दि. १८/१०/२०२५ रोजी मे. न्यायालयाने त्यांचा जबाब त्यांचे राहते घरी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे नोंदविला व त्यानंतर दि. १७/११/२०२५ रोजी सदर खटल्याचे निकालाकरीता तारीख नेमण्यात आली होती. परंतु त्यापुर्वीच दि.१३/११/२०२५ रोजी मा. आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे प्रदिर्घ चाललेल्या खटल्यातुन निर्दोषत्व ऐकण्यासाठी अप्पा हवे होते अशी खंत ॲड. मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केली.

Post Views: 67
Previous Post

किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

Next Post

विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन

ताज्या बातम्या

AIINNOVISION-2K26’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ

AIINNOVISION-2K26’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ

September 23, 2026
चित्रकला स्पर्धेत एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी ची विद्यार्थिनी श्रेया हिरोळी हिने प्रथम क्रमांक

चित्रकला स्पर्धेत एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी ची विद्यार्थिनी श्रेया हिरोळी हिने प्रथम क्रमांक

September 23, 2026
नरेंद्र‎ मोदींच्या‎ वाढदिवसानिमित्त‎ ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा‎ सेवा संकल्प;‎ आरोग्य शिबिरातून‎ नागरिकांची‎ आरोग्य‎ तपासणी

नरेंद्र‎ मोदींच्या‎ वाढदिवसानिमित्त‎ ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा‎ सेवा संकल्प;‎ आरोग्य शिबिरातून‎ नागरिकांची‎ आरोग्य‎ तपासणी

September 23, 2026

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

September 23, 2026
आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!

आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!

September 23, 2026
श्री न.फू.शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाचा महाप्रसादाने  समारोप

श्री न.फू.शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाचा महाप्रसादाने  समारोप

September 23, 2026
बोराळे आरोग्य केंद्राला ‘एनक्यूएएस”  मानांकनासाठी सीईओंचा हिरवा कंदील

बोराळे आरोग्य केंद्राला ‘एनक्यूएएस”  मानांकनासाठी सीईओंचा हिरवा कंदील

September 23, 2026

पिस्तुलाचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणांना लुटले – तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1247024

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!