सांगोला – खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून माढा लोकसभा मतदारसंघात २१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करून घेतले आहेत.
यापैकी सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे येथील नवीन पोस्ट ऑफिसचा शुभारंभ गुरुवार दि.९ एप्रिल रोजी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ.निकिता देशमुख, पंढरपुर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























