सोलापूर – शिवसेना सोलापूर शहर महिला संघटिका अश्विनी भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व माजी शहरप्रमुख मनोज शेजवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
येणाऱ्या काळात या जनसंपर्क कार्यालयातून गोर गरीब जनतेच्या व प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य मी अहो रात्र करेन. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे काम तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करण्याचा सक्षमपणे प्रयत्न करणार असल्याचे शहर महिला संघटिका अश्विनी भोसले यांनी सांगितले.
याप्रसंगी महिला उपशहरप्रमुख अनिता गवळी, ओबीसी महिला जिल्हाप्रमुख कृष्णा बिरादार, बाळासाहेब चौगुले, शंकर आईवळे यांच्यासह मान्यवर व असंख्य माता-भगिनी उपस्थित होते.

























