सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.या क्रीडा सप्ताहाच्या अध्यक्षस्थानी प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे होते.
या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रमुख अतिथी माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे सर व मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे या मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे व क्रीडांगणाचे पूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींचा शाल व बुके देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
शेवटी प्रमुख अतिथी माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे सर यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंनी खेळाच्या नियमांचे पालन करावे व मोबाईल पासून दूर राहावे व उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी सराव करणे गरजेचे आहे इ.बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांनी विद्यार्थ्यांनी खेळ खिलाडूवृत्तीने खेळावे, इतर विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावे असे आवाहन केले.
या क्रीडा सप्ताहामध्ये खो-खो,कबड्डी, सॉफ्टबॉल,बेसबॉल,क्रिकेट,संगीत खुर्ची,लंगडी,लिंबू चमचा इ.खेळ घेतले जाणार आहेत.
या क्रीडा सप्ताहास बसवराज कोरे,अण्णाराया तुप्पद,भारत राऊत,अनिलकुमार गावडे,क्रीडा शिक्षक परमेश्वर चांदोडे व प्रशालेतील विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या क्रीडा सप्ताहाचे प्रास्ताविक प्रतीक्षा बिडवे यांनी केले,सूत्रसंचालन रमेश आगवणे यांनी केले,तर आभार क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांनी मानले.

















