*भारतीय बौद्ध महासभा शाखा देगलूर नूतन कार्यकारिणी जाहीर*
*तालुका अध्यक्ष पदी मिलिंद बिरकंगण*
तालुका प्रतिनिधी…
देगलूर तालुक्यासाठी नवीन शाखा स्थापन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सिद्धार्थ नगर येथे माजी तालुका अध्यक्ष प्रा.डॉ.भिमराव माळगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजन करण्यात आले.
सदरील बैठकीला निरीक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड(द.)चे अध्यक्ष पी.एम. वाघमारे सर, बी. डी.कांबळे संस्कार उपाध्यक्ष व जिल्हा संस्कार सचिव नरसिंहराव दरबारे व आद. भिमराव भुरे माजी.जिल्हाध्यक्ष है उपस्थित होते. या बैठकीत तालुका कार्यकारिणी खलीलप्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून मिलिंद रामचंद्र बिरकगण यांची घोषणा करण्यात आली व तालुका सरचिटणीस म्हणून प्रा.भिमराव रामराव दिपके आणि कोषाध्यक्ष म्हणून भिमराव यादवराव देगलूरकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. .
तसेच संस्कार उपाध्यक्ष उत्तम वनंजे, संस्कार सचिव रत्नदीप मदने, संस्कार सचिव सुरज कांबळे, पर्यटन उपाध्यक्ष मिलिंद कावळगावकर, पर्यटन सचिव मोहन सिताफुले, पर्यटन सचिव डी.ए.ढवळे पाटोदेकर, संरक्षण उपाध्यक्ष मारुती हनुमंते, संरक्षण सचिव सुमेध सोनकांबळे, संरक्षण सचिव प्रा. अभिनंदन सिताफुले, संघटक संजय शिंगाडे, संघटक गंगाधर गायकवाड संघटक किशन वाघमारे संघटक गंगाधर गोविंद कांबळे याप्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. या या बैठकीला माजी तालुकाध्यक्ष गौतम कांबळे माजी शहराध्यक्ष संजय कांबळे यांची उपस्थिती होती. या बैठकीला तालुक्यातील अनेक धम्म बांधव उपस्थित होते..