पंढरपूर – बेलीचा महादेव सेवा परिवार महाशिवरात्री निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्री बेलीचा महादेव सेवा परिवार आयोजित रविवारी (दि.१५) सायंकाळी ६:०० बेलीचा महादेव मंदिरा समोर प्रदक्षिणा रोड पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड हिचा “शिवशंभो” भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांना साथसंगत हार्मोनियम अंगद गायकवाड तबला सोहम गोराणे पखवाज. ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे करणार आहेत.
तीन दिवस विविध सामाजिक बांधिलकी म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले असून त्यामध्ये शनिवार (१४ फेब्रुवारी) रोजी गरजूंसाठी १० ते २ मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत आरोग्य सेवा तसेच रविवारी सकाळी १० ते ५ यावेळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे देखील संयोजकांनी आवाहन केले आहे.
दरम्यान रविवारी रात्री भजनसंध्ये नंतर रात्री ९ वाजता शंभू महादेवाची महाआरती संपन्न होणार असून सोमवार १६ फेब्रुवारी रोजी १२ ते ३ महाप्रसादाचे आयोजन असून सर्व महादेव भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बेलीचा महादेव सेवा परिवार यांचे वतीने करण्यात येत आहे.
























