बार्शी – बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. शेतकरी बांधव किरण बरडे यांच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारले. यामुळे बागेला फुटलेले नवे अंकुर, द्राक्ष घड जळून चालले आहे. किरण बरडे यांचे अतोनात नुकसान आले आहे.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत यांनी शेतकरी किरण बरडे यांच्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बरडे यांनी राऊत यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी राऊत यांनी किरण व त्यांच्या मातोश्रींना धीर दिला.
यावेळी रणवीर राऊत म्हणाले, सदरची घटना अत्यंत निंदनीय, संताप आणणारी, निषेधार्ह आहे. या गुन्ह्याचा पोलीस तपास करत आहेत. हे कृत्य करणारा जो कोणी असेल, अशा वृत्तीला कोणीही पाठीशी घालणार नाही. पोलीस दोषींना शोधून काढतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















