उमरी – धर्माबाद कारेगाव फाट्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचे मराठवाड्यातील एकमेव पूर्णाकृती स्मारक असूनही सुशोभिकरण का होत नाही . .? प्रशासनाची केवळ कागदपत्रांची टोलवा टोलवी. तर राजकीय नेत्यांची उदासीनता एतिहासीक वसा जोपासण्याची कोनाचीही मानसिकता का होत नाही हा मुख्य चिंतनाचा प्रश्न बनला आहे.
देशाचा व मराठवाडा मुक्ती संग्रामाचां अमृत महोत्सव सर्वत्र धूमधडाक्यात साजरा केला गेला पण या अमृत महोत्सवी वर्षात देखील मराठवाड्यातील एकमेव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा येतील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्या संदर्भात मात्र अद्यापही सक्षम निर्णय होऊ शकला नसल्याने एव्हढी उदासीनता का? असा संतप्त प्रश्न परिसरातील जनतेतून व्यक्त केला जात आहे.
1973 साली हा पुतळा बनविण्यात आला तालुक्यातील धानोरा खुर्द येथील पांचाळ नामक कारागिरांनी हा पुतळा बनविला व बैलगाडी वरून कारेगाव फाटा येथे आणण्यात आला.1974 साली देशाचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम च्या लढ्याच्या वेळी लोहपुरुष तथा देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे या भागातून गेले होते त्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा व मराठवाडा मुक्ती संग्राम चां लढा भावी पिढी साठी प्रेरणादायी रहावा म्हणून कारेगाव येथील ज्येष्ठ नागरिक कै. पांडुरंग पाटील शिंदे यांनी हा पुतळा उभारला.
त्यानंतर दरवर्षी सामजिक कार्यकर्त्यांकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व 31ऑक्टोंबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.
उमरी धर्माबाद चे पूर्वश्रमीचे उपजिल्हाधीकारी डॉ सचीन खलाळ यांच्या कार्यकाळा पासून प्रशासनाचा प्रतिनिधी येथे येऊन पुष्पहार घालतात पण यावर्षी मात्र पूर्ण पुतळाच झाकून ठेवण्यात आला.
या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्या संदर्भात अनेकवेळा निवेदने देण्यात आली, आमदार ,खासदार यांनी देखील प्रशासनाला कळविले प्रशासनाच्या अनेक बैठका झाल्या व मध्येच कोणती तरी तांत्रिक अडचणी दाखवून अद्यापही सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न मात्र झाले नाहीत.
मराठवाडा मुक्ती संग्राम च्या निमित्ताने जिल्हा प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून जिल्हयात भरगच्च कार्यक्रम घेतले पण हा ज्वलंत ईतिहास अजरामर रहावा म्हणून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत किंवा येथे एखादा कार्यक्रम का आयोजीत केला नाही याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.
चौकट…. 1
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा
देशातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मधील नर्मदा सरोवर येथे केंद्र सरकारने उभारला त्यासाठी शेकडो करोड रुपयांची निधी तरतूद करण्यात आली.आज राज्यात व केंद्रात समविचारी सरकार आहे मग मराठवाडा मुक्ती संग्राम चा ईतिहास ज्वलंत ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे मराठवाड्यातील एकमेव आशा या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यास कोणती आडचन येत आहे हा प्रश्न कायम अनुतरीत आहे.
लोकप्रतिनिधी जाब विचारले की जिल्हाधिकारी बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देतात आणि बांधकाम विभाग पुन्हा पत्र तांत्रिक अडचणी चे पत्र देऊन आपली जबाबदारी टोलवून मोकळे होतात या पलीकडे कोणतीही कृती होत नाही हे विशेष.



















