विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेची तहसीलदारांकडे मागणी…
मुखेड प्रतिनिधी :- ऍड. रणजित जामखेडकर
मुखेड तालुक्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणीक कामाकरिता ईडब्लुएस प्रमाणपत्र लवकर मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह तहसिल कार्यालयात प्रस्ताव दाखल करुनही विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही.
प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे.प्रस्तावात त्रुटी काढून बाजुला ठेवल्या जात आहे त्यामुळे प्रस्ताव त्रुटीमध्ये न ठेवता त्या अर्जदाराकडून त्रुटीची पूर्तता करुन घेवुन तात्काळ ईडब्लुएस प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांच्याकडे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने दि.२७ जुन रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या वडील व आजोबांच्या शैक्षणीक व इतर दाखल्यावर मुस्लिम/मुसलमान असा जातीचा उल्लेख आहे तर मुलांच्या दाखल्यावर छबरबंद,मंसुरी,लदाफ अशाप्रकारे जातीचा उल्लेख झालेला आहे.
त्यामुळे वडिलांची आणी मुलाची जात जुळत नसल्यामुळे ईडब्लुएस प्रमाणपत्राची फाईल त्रुटीमध्ये टाकल्या जात आहे.पण अशाप्रकारच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षामध्ये १०० रूपयाचे बाँन्डवर शपथपत्र घेवुन ईडब्लुएस प्रमाणपत्र देण्यात आले पंरतु यावर्षी वडील व मुलांच्या दाखल्यावरील जात जुळत नसल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांची फाईल त्रुटीमध्ये टाकल्या जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून त्यांच्या प्रस्तावमधील त्रुटीची पूर्तता करवून घेवुन गोरगरीब, सर्वसामान्य मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास अडवणूक न करता शैक्षणीक दाखल्यावर असलेली वडील आणी मुलांची जात एकच असल्याचे शपथपत्र तसेच यापूर्वी त्यांच्याकडे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र नसल्याबाबतचे शपथपत्र १०० रूपयाच्या बाँन्डवर घेवुन विद्यार्थ्यांना ईडब्लुएस प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे.त्रुटीची पुर्तता करुन १०० रुपयाच्या बाँन्डवर शपथपत्र दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र नाही मिळाल्यास राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाध्यक्ष महेताब शेख, तालुकाध्यक्ष असद बल्खी, महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेचे तालुकाध्यक्ष खाजा धुंदी,पत्रकार मोहमद शेख, ऍड. युसुफ तांबोळी, ऍड.सय्यद शफी, बबलु भाई धुंदी,अल्पसंख्याक परीषदेचे शहर समन्वयक गौस मिर्झा,फिरदोस शेख,सय्यद जफर कादरी आदी उपस्तीथ होते.