Thursday, January 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच – दादाजी भुसे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच – दादाजी भुसे
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 30 जून, (हिं.स.) : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणा-या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा, समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावे, असे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे, यासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

श्री. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थाने, संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट, गाणगापुर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे.यातुन वेळेची, इंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावी, असे सूचित केले.

या लक्षवेधीत सदस्य शशिकांत शिंदे,भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Post Views: 11
Previous Post

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.

Next Post

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार – उदय सामंत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक – सामंत

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार - उदय सामंत

ताज्या बातम्या

करकंब येथे सुवासिनींनी तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात केला साजरा

January 14, 2026

पानगावात दुकानाला आग लागल्याने ५० लाख रुपयांचे साहीत्य जळून खाक

January 14, 2026

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रेणुका देवीची महाआरती

January 14, 2026

श्रीपूरचे भाऊसाहेब कुलकर्णी सामाजीक सेवा पुरस्काराने सन्माननीत

January 14, 2026

जिंक्यपद खो-खो स्पर्धा – महाराष्ट्राचा डबल धमाका! पुरुष–महिला संघांची उपांत्य फेरीत धडक

January 14, 2026

ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीअखेर संपणार सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी – राम पाटील

January 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन पारध येथे साजरा

January 14, 2026

सोलापुरात १९ जानेवारीला पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची ‘संगीत संध्या’ कार्यक्रम.

January 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...

प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कॉर्नर बैठक – विकास व सुशासनाचा निर्धार

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0614935

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697