करमाळा – मानव जीवनासाठी रक्तदान अत्यंत मोलाचे असून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी व्यक्त केले.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ, करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी दत्त मंदिर, विकास नगर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, माजी नगरसेविका संगीता श्रेणीक खाटेर, माजी नगरसेवक दादाराम लोंढे, उद्योजक महेश मोरे उपस्थित होते. करमाळा तालुका अध्यक्ष संतोष हंडाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना संजय उर्फ पप्पु सावंत म्हणाले की, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे अध्यात्मिक कार्य समाजाला दिशा देणारे असून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मानवकल्याणासाठी राबविले जाणारे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे. या संप्रदायाच्या सामाजिक धार्मिक कार्यासाठी करमाळा नगर परिषदेच्यावतीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब पाटील यांनी केले. त्यांनी कोरोना काळातील मदतकार्य, पूरग्रस्तांना सहाय्य, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, अन्नदान यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.श्री कमलाभवानी ब्लड बँक करमाळा यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुका सेवाध्यक्ष संतोष हंडाळ माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, महिला तालुकाध्यक्ष रोहिणी सरडे, ब्लड नीडचे प्रमुख भाऊसाहेब पाटील, कार्यवाहक बाबासाहेब क्षीरसागर, युवाप्रमुख रोहन शिंदे, शिवाजी मारकड , शरणप्पा आंधळकर, प्रकाश जाधव, संतोष सरडे ,किसन चोरमले, नवनाथ भोसले,शिवाजी ननवरे, दत्तू हिरडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. करमाळा तालुक्यातील सर्व भक्तगण महिला भगिनी शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















