सांगोला – सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे सुपुत्र जय सर्जेराव काशीद यांची भारतीय सेनेमध्ये अग्नीवीर साठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सोनंद येथील आजी माजी सैनिक कल्याण संघ यांचे वतीने माजी सैनिक उत्तम चौगुले यांचे हस्ते जय काशीद यांचा सत्कार करण्यात आला.
असेच कार्य संघटनेच्या वतीने पुढे चालू ठेवावे, जेणेकरून समाजाला एक चांगली शिस्त लागेल. तसेच देश सेवेसाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे. यासाठी सर्व माजी सैनिकांनी असे विचार आपल्या परिसरात मांडले पाहिजेत असे मनोगत उत्तम चौगुले यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनंद संघटनेचे अध्यक्ष ऑनरी सुभेदार मेजर रामचंद्र काशीद, सचिव ठोकळे व संघटनेचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.



















