नवीन नांदेड – महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या २०२५ -२६ या कालखंडासाठी नाशिक येथे निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी नांदेड सिडको येथील रहिवाशी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्धन गुपिले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्धन गुपिले यांची बिनविरोध निवड झाली आहे ही निवडणूक हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नाशिक येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडली.
या निवडणुकीत सेवानिवृत्त न्यायमूर्ती भगवंतराव गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्धन गुपिले यांची सर्व स्तरातून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

























