पंढरपूर – देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी व अभियांत्रिकी मधील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जेईई मेन्स -२०२६ परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे करण्यात आलेले होते. कोर्टी पंढरपूर येथील सिंहगड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता अधिक मजबूत केल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यात निनाद निशिकांत शिंदे (९२.०९%), स्नेहल योगेश असबे (९१.२५%) व समर्थ संतोश इंगोले (८२.७७%) यांनी यश प्राप्त केले. ग्रामीण गुणवत्तेला देशपातळीवर नेण्याचा आमचा मानस असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
अकॅडमी मधील नियमित सराव परीक्षा, प्रत्येक सराव परीक्षेनंतर सविस्तर अँनेलेसीस व वैयक्तिक लक्ष याचा फायदा झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सर्व विद्यार्थ्यांना सिंहगड अकॅडमीचे प्रा. रूपेश बावलेकर (फिजीक्स), डॉ. एम. एम. आवताडे (केमिस्ट्री), प्रा. विठ्ठल बोचरे (मॅथेमॅटिक्स) व प्रा. सायली जाधव (बायोलॉजी) यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यां, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, सिंहगड अकॅडमीचे विभागप्रमुख डॉ. संपत देशमुख व डॉ. अनिल निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
























