करकंब : जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारण, विज्ञान, कला, संस्कृती तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा,समान हक्कांसाठी जागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने मातृशक्तीचा सन्मान, संस्काराचा गौरव व कर्तृत्वाचा उत्सव या भावनेतून क्रीडा भारती पंढरपूर जिल्ह्याच्या वतीने जिजामाता पुरस्कार गौरव समारंभाचे आयोजन कर्मयोगी सभागृह पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी करकंब ता.पंढरपूर येथील योगा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय दुहेरी सुवर्णपदक प्राप्त योगा खेळाडू अमृता विनायक सरगुले यांच्या आई विद्या विनायक सरगुले यांना सीमा परिचारक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते जिजामाता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंजली अवताडे,संगीता काळे,करुणा शिवशरण,खातून जामदार या महिला भगिनींनाही जिजामाता पुरस्काराने गौरविण्यात आले.याप्रसंगी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे पदाधिकारी, lमहिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
























