बार्शी – सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. बाबुराव डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना गेल्या बावीस वर्षांपासून दिले जातात. यावर्षी सन २०२५-२६ चे पुरस्कार जाहीर झाल्याचे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे यांनी सांगितले.
या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व बुके असे आहे.
या पुरस्काराचे वितरण स्व.शिवाजीराव डिसले शेठ यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अर्णव शैक्षणिक संकुल, सासुरे फाटा,वैराग ता बार्शी येथे होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सूर्यकांत क्षीरसागर, महिला भूषण पुरस्कार म्हणून राणूबाई जगताप, डिजीटल पत्रकारितेतून प्रदीप कापसे, विजय निलाखे यांना पत्रकारिता पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील कामगिरीनिमित्त भीष्माचार्य चांदणे, युवा उद्योजक गणेश शालगर, नझीर शेख शैक्षणिक पुरस्कार, क्रीडा पुरस्कारासाठी किरण देशमुख, भगवंत साळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,ह.भ.प. तुकाराम मस्के यांना अध्यात्मिक पुरस्कार, कला पुरस्कारासाठी शशिकांत लांडगे तर सामाजिक पुरस्कार प्रसाद मोहिते यांना जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, माजी सभापती अनिल डिसले, पो.नि. कुंदन गावडे, बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके आदी उपस्थित असणार आहेत.
अशाप्रकारे विविध बारा क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी दिली.


























