करंजगावात सावळागोंधळ; नाल्याच्या कामावर वारेमाप पैसा खर्च; पण गावात पाणी तुंबलेलेच; रोगराईची भर
सरपंच राहतो मळ्यात, ग्रामसेवक पैशाच्या खळ्यात
भोकरदन : तालुक्यातील करजगांव ग्रामपंचायतचे सरपंच राहायला मळ्यात, ग्रामपंचायत कार्यालय पाण्याच्या तळ्यात, ग्रामसेवक मात्र पैशाच्या खळ्यात ! अशी अवस्था झाली असल्याचा आरोप करजगाव येथील ईश्वर लोखंडे यांनी केला आहे. नालीच्या कामावर आणि पाईपलाईनच्या कामावर लाखो रुपये खर्च झाला. परंतु गावातले एक थेंबही पाणी गावाच्या बाहेर निघाले नाही. पाणी पूर्वीप्रमाणे जसे आहे तसे येऊन साचते. गटारी तुंबतात आणि गावामध्ये रोगराई पसरते. ग्रामपंचायतीला याच्याशी काही देणे घेणे नाही. ग्रामसेवक गावात येत नाही.
ग्रामपंचायतची मीटिंग ग्रामपंचायत ऑफिस मध्ये होत नाही. ग्रामसभा घेतली जात नाही. ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी करायच्या कोणाकडे? त्यामुळे गांवात एका प्रकारचा असंतोष असून तरुण मंडळी मात्र संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. एकमेव मागणी हीच असणार आहे ग्रामपंचायतच्या मिटींगमध्ये ग्रामस्थांचा सर्व तक्रारी ऐकून घेतल्या जाव्यात. ग्रामसभा घेण्यात यावी. शासकीय आलेल्या फंडाचा गावाला हिशोब देण्यात यावा व कोणती कामे केली. कामे ठरवतांना गावाची मंजुरी घेण्यात यावी. सध्यातरी शासकीय योजनांच्या लाखो रुपयांच्या रकमेचा अपहार झालेला आहे. शासकिय योजना फक्त हडप करण्यासाठीच आणल्या जात आहेत गावाला याचा फायदा नाही. ग्रामपंचायत च्या समोर पावसामुळे तळे साचलेले आहे त्यामुळे ग्रामपंचायत तळ्यात का तळे ग्रामपंचायत मध्ये अशी अवस्था झालेली आहे. पैसा पाण्यात अशी चर्चा गावात आणि परिसरात रंगायला लागलेली आहे. याबाबत सविस्तर असे की ग्रामपंचायत च्या निवडणुका होऊन एक दीड वर्ष झाले. महिला सरपंच आहे. काही जाणती मंडळी व ग्रामसेवक सरपंचाच्या सही चा गैरफायदा घेऊन लाखो रुपये खिशात घालत आहेत.
चौकट :-
सावळागोंधळ सुरू; उच्चस्तरीय चौकशीची गरज
दरम्यान ग्रामसेवक लाखो रुपये ग्रामपंचायतच्या खात्यावरून काढत असून त्याचा हिशोब ग्रामपंचायत च्या मीटिंगमध्ये दिल्या जात नाही. कोणतेही काम केलेले दिसत नाही मग हा पैसा जातो कुठे ? गोठ्यांचे लोकांकडुन पैसे घेतात एकचगोठा दोघांच्या नावावर दाखवुन अधिकाऱ्यांना पैसे देवुन बीलं उचलतात टंकरचे पाणी मिरचीला देतात असा सावळा गोंधळ चालु असुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज आहे. असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायत ची मीटिंग होत नाही. सर्व सदस्यांना मीटिंगला बोलावल्या जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत चा पैसा किती काढला किवा किती खर्च झाला याची माहिती फक्त ग्रामसेवकाला माहित आहे.
दोन वर्षाच्या काळात कधीही ग्रामसभा घेतल्या गेली नाही. त्यामुळे सतत गावामध्ये ग्रामसभेचे चर्चा होत असताना व मागणी होत असताना त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जाते. परिणामी शासनाच्या आलेले अनुदान लाखो रुपया अनुदान कोणतेही विकास कामे न करता तसेच काढून घेतले गेले याचे शासकीय पातळीवर चौकशी होण्याची गरज असून गावातील नागरिक सुद्धा संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती ईश्वर लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.