जेऊर – कुंकूवासाठी प्रसिद्ध असलेल्या केम तालुका करमाळा येथील श्रीमती वंदना येवले यांचे पतीचे छत्र हरपले असताना त्यांनी संघर्ष करीत कुंकू व्यवसायात जिद्द व चिकाटीने भरारी घेतली आहे.
वंदना कल्याण डोंगरे, यांचे बालपण तसेच इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झाले. त्यानंतर 1995 मध्ये त्यांचे लग्न प्रदीप मधुकर येवले केम तालुका करमाळा यांच्यासी. झाले त्यांना दोन मुली आहेत अमृता आणि श्रेया. येवले घराण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय कुंकू कारखाना हा आहे. घरचाच व्यवसाय असल्यामुळे घर कामासोबतच कारखान्यातील कामाची, व्यवसायाची ही आवड मला निर्माण झाली.
सर्वसाधारणपणे आपण पाहतो की व्यवसाय कामांमध्ये कितीही माणसे असले तरी कमी पडतात, त्यामुळे त्या पतींना कारखान्याच्या कामामध्ये मदत करू लागला. त्यानी कुंकू, गुलाल, भंडारा इत्यादी कसे बनवायचे हे प्रमाणबद्ध शिकवले. रंगनी करणे, दळणे, वाळवणे तसेच तयार मालाची प्रतवारी करणे इत्यादी सर्व त्याना शिकवले. व्यवसायात अडी अडचणी येतच असतात, त्यामुळे कारखान्यात माल बनवण्याचं कसब माहित झालं म्हणून त्या कारखान्यात लक्ष देऊ लागल्या व बाहेर गावातील व्यापाऱ्यांची संपर्क करणं मालाची देवाण-घेवाण करणे, पत्रव्यवहार, बँकेचे कामकाज हे सर्व प्रदीप शेठ पाहू लागले. व्यवसाय व्यवस्थित चालला होता.
मोठ्या मुलीचे एम एस सी फिजिक्स शिक्षण झाले व तिचे 2020 मध्ये लग्न झाले, धाकटी श्रेया सध्या शिक्षण घेत आहे. त्यानंतर माझे पती यांना आजार झाला. अकलूज, पुणे इत्यादी ठिकाणी त्यांचा इलाज करण्याचा प्रयत्न केला. औषधाचा, दवाखान्याचा खर्च वाढला, व्यवसायावरच दुर्लक्ष होत होते, तरीसुद्धा कारखान्यात कामगारांच्या साहाय्याने जेवढं जमेल तेवढं उत्पादन मी करत होते व फोनवर तसेच गावातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने देवाण-घेवा चालू होती, म्हणा तशी उधारी वसूल होत नव्हती. अशातच 2022 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले, आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला, समोर अनेक प्रश्न दिसू लागले. घरात कर्ता कुणीही नसल्यामुळे हा व्यवसाय करण्याशिवाय त्याना पर्याय पुढे दिसत नव्हता.
एक महिना दुःखात गेल्यानंतर पुन्हा व्यवसाय करण्याचा त्यानी नातेवाईक भावकी यांचा विचाराने ठरविले. श्री उत्तरेश्वराच्या पावन भूमीत गावातील कारखानदार आणि गावकऱ्यांची तसेच कामगार, आम्हाला कच्चामाल पुरवठा करणारे व आमच्याकडून पक्का माल घेणारे व्यापारी यांची खंबीर साथ मिळत आहे. एका स्त्रीने हा व्यवसाय करायचा म्हणजे अडचणी येतातच मात्र त्यावर मात करत सर्वांच्या आशीर्वादाने पुढे पुढे जात आहे. आणि त्यांच्या पतींचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
























