तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : सत्ताधारी मंत्री, आमदाराचे वर्तनामुळे राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. मात्र त्यांना जरासुद्धा लाज वाटत नाही,असे सांगून ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत म्हणाले,’ अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना 4 मंत्र्याना डच्चू देण्यास सांगितले आहे. त्यामध्ये कोकाटे यांचाही समावेश असल्याची माझी माहिती आहे, असा दावा केला आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री बच्चू कडू,आदींनी त्यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...