Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील हल्ले थांबतील : श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंदिर : न्यास जिल्हा अधिवेशन !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 20, 2025
in marathwada, top news
0
विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील हल्ले थांबतील : श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/ छत्रपती संभाजीनगर : धर्मासाठी सर्वांना संघटित व्हावे लागेल. संघटनामुळे अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणाऱ्या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील. वेळीच जागे व्हा, तरच जागेवर राहाल, अन्यथा ही जागा सोडून जावे लागेल, असे प्रतिपादन श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज यांनी केले. ते अधिवेशनाच्या प्रथम सत्रात बोलत होते.

श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास, श्री पावन गणेश मंदिर, दिवाण, देवडी, सोमठाणा येथील श्री रेणुकामाता मंदिर, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन पार पडले. श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास येथे दि.२० जुलै रोजी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु नंदकुमार जाधव, श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंदगिरीजी महाराज, पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज, माजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, हिंदु जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रल्हाद शिंदे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रल्हाद शिंदे यांनी केले तर अधिवेशनाची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी मांडली.

या अधिवेशनाला परभणी, नांदेड, जालना, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील विविध मंदिरांचे १८० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. मंदिरांमध्ये चालू असलेल्या पाश्चात्य कुप्रथा थांबवा ! सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती अनेक मंदिरातील मूर्तींना नाताळच्या काळात सांताक्लोजचा वेष परिधान केला जातो. देवाचा केक कापून वाढदिवस साजरा करणे, मंदिरात दान दिलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर, काही ठिकाणी देवस्थानांच्या गायी कसायांना विकणे यांसारख्या कुप्रथा घडत आहेत. तसेच वैयक्तिक मानापमानामुळे अनेक मंदिराकडे दुर्लक्ष करणे, यामुळे मंदिर संस्कृती आणि मंदिरे बदनाम होत आहे, यावर उपाय म्हणजे मंदिर विश्वस्तांनी मंदिर संस्कृती परंपरा प्रथा यांचे पालन हिंदु संस्कृती नुसार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

मंदिरे – धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी ! सद्गुरू नंदकुमार जाधव

मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे, तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झालेले आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणाऱ्यांना धर्माचा अभ्यास नसतो. तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांतून संस्कारवर्ग घेणे, धर्मशास्त्र समजावून सांगणे हे कार्य नियमित व्हायला हवे. हिंदु समाजाची जन्म हिंदु ते कर्म हिंदु पर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले.

या वेळी निवृत्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात तर सनातनचे संत पू . सुरेश कुलकर्णी यांनी तुळजाभवानी देवस्थानातील भ्रस्टाचाराविषयी दिलेल्या कायदेशीर लढ्याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या जमिनीविषयी येणाऱ्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समारोपीय सत्रात महंत नारायण नंदगिरी महाराज, श्री. श्यामकुमार जैस्वाल, श्री. प्रमोद नरवाडे, कु. प्रतीक्षा कोरगावकर, कु. प्रियंका लोणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Post Views: 35
Previous Post

डच्चू मिळणाऱ्या चार मंत्र्यांत कोकाटे : संजय राऊत 

Next Post

ना. पंकजाताईताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सामाजिक सेवा सप्ताह’

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ना. पंकजाताईताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सामाजिक सेवा सप्ताह’

ना. पंकजाताईताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सामाजिक सेवा सप्ताह’

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1025215

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!