माळशिरस – श्रीराम शिक्षण संस्था संचलित, श्रीराम कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय, पानीव येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. हरी हाके सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या कार्यामुळे आज महिलांना शिक्षण, सन्मान व स्वाभिमान प्राप्त झाला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा कृषी विस्तार विभाग प्रमुख प्रा धीरज दोरकर यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून यशाची ज्योत अखंड चालू ठेवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक सौ. श्रीलेखा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील, सहसचिव डॉ. समीर पवार, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे प्राचार्य डॉ. हरी हाके , प्रा. पांडुरंग कोळेकर व प्रा.सुगंध शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमास श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी हाके , श्रीराम कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सुगंध शिंदे , तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश पाटोळे, प्रा. धीरज दोरकर व प्रा. विजय तरंगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विभागातील स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

























