नायगाव / नांदेड – नायगांव तालुक्यातील बहुचर्चित कुंटूर जिल्हा परिषद गट यंदा इतर मागासवर्गीय महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या गटात अभूतपूर्व तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिकराजकारणात बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गटात पहिल्यांदाच तीन प्रभावी उमेदवारांममध्ये चुरस निर्माण झाली आहे.
कुंटूर साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कुंटूरकरांच्या सौभाग्यवती सौ. मधुमती कुंटूरकर या पारंपरिक बालेकिल्ल्याच्या बळावर दमदार दावेदार मानल्या जात आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकरांच्या सौ.दिपाली पाटील होटाळकरांची उमेदवारी ही चर्चेत असून, त्यामुळे लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मूळ ओबीसी समाजातील श्रीमती अहिल्याबाई बालाजी चोंडे यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला असून,कुंटूंर सर्कलच्या स्थानिक पातळीवर धनगर समाजाचा त्यांच्या नावाला सध्या प्रथम पसंती मिळत आहे.
काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व छत्री शेळगांव ग्रामपंचायतचे सरपंच संजय चोंडे यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मराठा नेतृत्वातील मतविभाजन ओबीसींसाठी फायद्याचे?
कुंटूरकर व पाटील या दोन्ही बाजूंच्या मराठा नेतृत्वा मध्ये मतांचे विभाजन झाले, तर ओबीसी मतांची एकजूट चोंडे यांच्या बाजूने निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे, भाजप व राष्ट्रवादी (अजितदादा गट) हे सत्तेचे भागीदार असल्याने त्यांच्या मतांमध्ये तडा गेल्यास काँग्रेसला अनपेक्षित बळ मिळण्याची शक्यताही राजकारणात रंगत आणत आहे.
शिवराज पाटील होटाळकर हे पक्षातील प्रमुखपदी असल्याने जिल्ह्यातील सर्वच पाच नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या जबाबदा ऱ्यांचा खुप ताण असुन. यापूर्वी शिवराज पाटील होटाळकरांनी तळेगाव जि प सर्कल (ता. उमरी) व मांजरम जि प सर्कल निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु कुंटूंर सर्कल मध्ये त्यांचा जन संपर्क खुप मोठ्या प्रमाणात असुन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच यश प्राप्त करतील असा काही जानकार मंडळीचे मते व्यक्त केली जात आहेत.तर दुसरीकडे सध्या ते जिल्हाध्यक्ष असल्याने जिल्ह्यातील निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या उमेदवारीवर अजितदादा गटात पुनर्विचार होईल का, याकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे.तर कुंटुर सर्कल मधील स्थानिक नाराजीने समीकरणे बदलण्याची चिन्हे गेल्या काही वर्षांत कुंटूरकर परिवार हा साखर कारखान्याच्या कामकाजात गुंतल्याने स्थानिकसह पंचक्रोशीती ल गावे ही विकासाच्या योजनेपासून वंचित राहिल्याने, त्यामुळे स्थानिक नागरिकांत सध्या प्रचंड नाराजी वाढलेली आहे.
यासोबतच मूळ ओबीसी समाजाला संधी न मिळाल्याची भावना अधिक तीव्र होत असून, याचा प्रत्यक्ष परिणाम हा देशमुख व पाटील गटाच्या मतांवर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.एकंदरीत, कुंटूर जि.प. गटातील ही तिरंगी लढत स्थानिक राजकारणात चुरस निर्माण करण्याबरोबरच अनिश्चिततेचे सावट आणणारी ठरणार, हे निश्चित!

















