मुदखेड – शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदू हृदय सम्राट शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आज २३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात असून शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक यांच्या नियोजित प्रतिमेच्या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार, माजी शहरप्रमुख अंकुश मामीडवार,
शिवसेनेचे भोकर विधानसभा प्रमुख विश्वभार पाटील पवार,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण,मुन्ना चौधरी,माधव पाटील कदम, मारुती पांचाळ, शिलवंत डोंगरे,अमोल चौदंते,गोविंद गड्डमवार, गजानन पडोळे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अंकुश मामीडवार यांनी केले होते.























