सांगोला – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली व सचिव पी.पी.पेठकर यांचे सहकार्याने सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने कै.वामनराव शिंदे साहेब माध्यमिक कन्या विद्यालय, सांगोला येथे बालिका दिन व पर्यावरण संरक्षणाविषयी कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.एम.एन.ढाळे, सचिव ॲड.ए.टी.तोरणे, जेष्ठ सदस्य ॲड.विजयसिंह चव्हाण, महीला प्रतिनीधी ॲड.एस.व्ही.बोत्रे, ॲड.एच.डी.मेनकुदळे, ॲड.सी.व्ही.बनकर, ॲड.एन.एम.जवंजाळ, ॲड.पी.एच.चव्हाण, विद्यालयाचे सचिव निलकंठ शिंदे, मुख्याध्यापक आर.एम.पवार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पुजनाने करण्यात आली. या कायदेविषयक शिबीराचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण हा होता. या विषयावर ॲड.विजयसिंह चव्हाण यांनी वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाकरीता तयार करणेत आलेले अनेक कायदे, कायद्याची निर्मिती व गरज, अंमलबजावणी व त्याचे आपल्या दैनंदीन जीवनामध्ये होणारे फायदे समजावून सांगितले.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा एका कुटूंबाचा घटक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यापर्यंत देण्यात आलेली माहीती ही कुटूंबापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे हे शिबीर शाळेमध्ये घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक आर.एम.पवार यांनी मनोगतात सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सांगोला न्यायालयाचे सहा.अधिक्षक ए.एस.बमनळ्ळी, डी.डी.मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपीक डी.एम.डोईफोडे व विद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. तसेच पर्यावरण संरक्षणाकरीता समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे खूप महत्वाचे आहे. याकरीता प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावून त्या झाडाचे संगोपन करणे गरजेचे आहे.
– पी.आर.कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश


















