एनडीएकडून बिर्ला, विरोधकांतर्फे के. सुरेश रिंगणात
नवी दिल्ली, 25 जून (हिं.स.) : लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना मिळावे ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे एनडीएतर्फे ओम बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येताच विरोधकांकडून के. सुरेश यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
लोकसभा अध्यक्षपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालेले नाही. ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर इंडि आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या मागणीवर कोणताही प्रतिसाद न आल्याने के. सुरेश यांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारीही दाखल केली आहे. उपसभापतीपद देण्याची अट पूर्ण न झाल्याने विरोधकांनी उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र संख्याबळ पाहता एनडीएच्या उमेदवाराचा सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निकालानंतर अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. इंडी अलायन्स काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने उमेदवारी दाखल केली.
दरम्यान, यासाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार धरले. विरोधकांनी सभापतीपदासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण प्रथेप्रमाणे उपसभापतीपद विरोधकांना द्यावे, असा आमचा मुद्दा होता, अशी परंपरा आहे, असे राहुल गांधी म्हणालेत. तर यासंदर्भात पियूष गोयल म्हणाले की, आम्ही अटींच्या आधारे पाठिंबा देण्याचे समर्थन नाकारतो. विरोधक अटींच्या आधारे पाठिंबा देण्याबाबत बोलत आहेत. लोकसभेच्या परंपरेत असे कधीच घडले नव्हते. लोकसभा अध्यक्ष किंवा उपसभापती हे कोणत्याही पक्षाचे नसून ते संपूर्ण सभागृहाचे आहेत असे गोयल यांनी सांगितले